Join WhatsApp group

Ads

--

सकारात्मक तसेच विकासाचा संकल्प घेऊन जनतेच्या समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचा गप्पा वर विश्वास नसून कृतीवर व जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये विश्वास

By Sarkarmzanews

May 29, 2025 7:05 pm

Ads

दिनांक २९ : अकोला : सकारात्मक तसेच विकासाचा संकल्प घेऊन जनतेच्या समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचा गप्पा वर विश्वास नसून कृतीवर व जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये विश्वास असल्यामुळे आज अतिवृष्टीमुळे 132 वर्षाच्या नंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आली याचं राजकारण न करता दोषारोपण न करता मार्ग काढण्यासाठी व जबाबदारी व जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आज तिसऱ्या दिवशी सुद्धा ऑन द स्पॉट आपल्या कार्यकर्त्यांसोबत आजही जनतेची संवाद साधून 13732 नागरिकाची त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या .

समस्या ऐकून न घेता प्रत्यक्षात काम झालं पाहिजे या दृष्टीने महानगरपालिका वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ऑन द स्पॉट भाजपा पदाधिकारी व त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत माजी महापौर भाजपा नेते विजय अग्रवाल व जयंत मसने यांच्यासोबत संपूर्ण शहरातील विविध भागांमध्ये भेटी देऊन अधिकाऱ्यांना काम करून येत्या पाच दिवसांमध्ये समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले केवळ नाटक बाजी न करता प्रत्यक्षात जनतेला होणारी अडचण अधिकाऱ्यांची अडचण निधी संदर्भात ताबडतोब निर्णय घेण्याचा दृष्टीने आमदार सावरकर यांनी कारवाई केली अनेक ठिकाणी झाडांमुळे होणारी अडचण तसेच वीज वितरण कंपनी तार, वायर, काढण्याचे निर्देश दिले तसेच रस्ते संदर्भात अतिक्रमण या संदर्भात त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व येत्या पाच दिवसात समस्या निकाली व त्यामुळे मार्ग काढण्याचा आदेश दिले महानगरपालिकेतले अधिकाऱ्यांसोबत सतत चार तास वेगवेगळ्या भागांमध्ये उमरी मोरेश्वर कॉलनी, व विविध शहरातल्या भागाचा आढावा घेतला.


यावेळी विजय अग्रवाल यांनी अनेक सूचना दिल्या खासदार अनुप धोत्रे यांनी शेतकरी तसेच शहरी भागातील विविध भागांमध्ये होणाऱ्या अडचणी नाल्या साफसफाई बांधकाम मुळे होणारे अडचणी तसेच रस्ते व वेगवेगळ्या समस्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या व तातडीने सोडण्याचे आदेश दिले.


खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर सातत्याने तिसऱ्या दिवशी सुद्धा ऑन द स्पॉट वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत आहे आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ताबडतोब समस्या निकाली काढण्याचे आदेश देत आहे . यावेळी त्यांच्यासोबत जयंत मसने, गिरीश जोशीअभियंता अजय गुजर, अमोल डोईफोडे, वाडेकर, आरोग्य झोन ऑफिसर पवार, वीज वितरण कंपनी दिनोरे, सुनिता अग्रवाल ,अनिल मुरूमकर, निलेश काकड अंबादास उमाळे माधव मानकर, आकाश ठाकरे , राजू सरर्प, विशाल पारोचे,सौ धोत्रे , विपुल घोगरे, ध्रुवखुणे, छोटू लुंगे, निलेश ठाकरे , विवेक भरणे संदीप गावंडे प्रशांत अवचार देवेंद्र देवर आधी त्यांच्यासोबत होते.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!