Join WhatsApp group

Ads

आमदार पिंपळेंच्या आक्रमक खेळीने मूर्तिजापूरात सत्ता परिवर्तन

By Sarkarmzanews

January 12, 2026 7:08 am

Ads

मूर्तिजापूर : दिनांक १२ :गेल्या तीन दशकांपासून मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या राजकारणावर घट्ट पकड ठेवून असलेली प्रस्थापितांची सत्ता २०२५ च्या सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीत अक्षरशः कोसळली आहे.

आमदार हरीश पिंपळे यांच्या आक्रमक, सूक्ष्म आणि कार्यकर्ताकेंद्रित रणनीती मुळे शहरात भाजपचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले असून, जुन्या राजकीय धुरंदरांना मतदारांनी ठामपणे नाकारले आहे.ही

हि निवडणूक केवळ सत्तांतराची नव्हे, तर मूर्तिजापूरच्या राजकीय पुनर्रचनेची सुरुवात ठरली आहे.

नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत साबळेंचा बाजीमार

या निवडणुकीत सर्वाधिक उत्सुकता थेट नगराध्यक्ष निवडीबाबत होती. आमदार हरीश पिंपळे यांनी हर्षल रामेश्वर साबळे या तरुण आणि नव्या चेहऱ्यावर विश्वास टाकत धाडसी निर्णय घेतला. लढत अत्यंत अटीतटीची असतानाही पिंपळे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून साबळे यांना विजयाच्या शिखरावर पोहोचवले. केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर तब्बल ११ नगरसेवकांचे संख्याबळ मिळवत भाजपने नगरपरिषदेत भगवा फडकावला आहे.

प्रस्थापितांचे ‘सिंहासन’ जमीनदोस्त

मूर्तिजापूरच्या राजकारणात गेल्या ३०–३५ वर्षांपासून काही ठराविक गटांचे वर्चस्व होते. जुन्या वस्तीपासून स्टेशन परिसरापर्यंत चालणारी त्यांची राजकीय हुकूमत या निवडणुकीत मतदारांनी संपुष्टात आणली. सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर, प्रस्थापितांच्या साम्राज्याला सुरुंग लावत आमदार पिंपळे यांनी हे यश मिळवले. ‘काळ बदलतो, सत्ता बदलते’ याचा प्रत्यय शहराच्या राजकीय वर्तुळाला आला आहे.

आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा कणा म्हणजे दररोज नियमितपणे जनता दरबार.

शहर व तालुक्यातील नागरिक आपल्या दैनंदिन प्रश्नांसह थेट आमदारांपर्यंत पोहोचत असून, पाणी, वीज, रस्ते, घरकुल, महसूल व नगरपरिषदेसंबंधी तक्रारींवर तात्काळ दखल घेतली जाते.

निवडणूक काळापुरती नव्हे, तर वर्षभर सुरू असलेली ही लोकाभिमुख प्रक्रिया जनतेशी थेट संवाद साधणारी ठरली असून, यामुळे आमदार आणि नागरिकांमधील दुरावा संपला आहे.

हाच सातत्यपूर्ण संपर्क आणि तत्काळ निर्णयक्षमतेमुळे ‘पिंपळे पॅटर्न’ला शहरात मोठे जनसमर्थन मिळाल्याचे दिसून येते.

शहर व तालुक्यातील नागरिक आपल्या दैनंदिन प्रश्नांसह थेट आमदारांपर्यंत पोहोचत असून, पाणी, वीज, रस्ते, घरकुल, महसूल व नगरपरिषदेसंबंधी तक्रारींवर तात्काळ दखल घेतली जाते.

निवडणूक काळापुरती नव्हे, तर वर्षभर सुरू असलेली ही लोकाभिमुख प्रक्रिया जनतेशी थेट संवाद साधणारी ठरली असून, यामुळे आमदार आणि नागरिकांमधील दुरावा संपला आहे.

भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगा, आमदारांची ‘वेट अँड वॉच’ नीती

निवडणुकीनंतर शहर व तालुक्यातील अनेक गट भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक झाले आहेत. मात्र, आमदार हरीश पिंपळे यांनी घाई न करता ‘छाननी आणि चाचपणी’ची भूमिका घेतली आहे. पक्षप्रवेशापूर्वी निष्ठा, कार्यपद्धती आणि पार्श्वभूमी तपासली जात असल्याने संधीसाधू नेत्यांची चांगलीच अडचण झाली असून अनेकांना सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यावी लागत आहे.

स्वपक्षातील सत्तालोलुपांना सणसणीत चपराक

या निवडणुकीत विरोधकांबरोबरच स्वपक्षातील सत्तेसाठी आग्रही असलेल्या आणि आडकाठी आणणाऱ्या नेत्यांनाही आमदार पिंपळे यांनी ठाम संदेश दिला आहे. सामान्य, गोरगरीब कार्यकर्त्यांना सन्मान आणि संधी देत त्यांनी नव्या नेतृत्वाची फळी उभी केली आहे. यामुळे पक्षातील निष्प्रभ झालेल्या जुन्या गटात अस्वस्थता पसरली आहे.

यशामागची ठळक कारणे

*तळागाळातील कार्यकर्त्यांशी आमदारांचा थेट आणि सातत्यपूर्ण संपर्क

*प्रस्थापितांना बाजूला सारत नव्या, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना संधी

*प्रत्येक प्रभागात केलेली सूक्ष्म आणि काटेकोर बांधणी

*जुन्या चेहऱ्यांपासून मुक्त होण्याची जनतेची तीव्र इच्छा

*वर्षभर सुरू असलेली ही लोकाभिमुख प्रक्रिया जनतेशी थेट संवाद

मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या निकालाने हे स्पष्ट झाले आहे की, आता जुन्या वळणाचे राजकारण शहरात चालणार नाही.

आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूरच्या राजकारणाची घडी नव्याने बसवली असून, या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची पायाभरणी अधिक मजबूत झाली आहे. विरोधकांसमोर आता कठीण आव्हान उभे ठाकले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!