Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर शहराला बनवू नवी मुंबई — नानकशेठ नेभनानी यांचा दावा

By Sarkarmzanews

October 18, 2025 7:56 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १८ ऑक्टोबर २५ : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले आहे.

प्रत्येक राजकीय गट आपली ताकद दाखविण्याच्या तयारीत असून विविध राजकीय समीकरणांवर चर्चा रंगू लागली आहे.

मुर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष नानकशेठ नेभनानी यांनी यंदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करत नगरपरिषद रणांगणात उतरायची तयारी दाखविली आहे.

त्यांनी सांगितले की, राजकीय समीकरण जर त्यांच्या बाजूने राहिले, तर ते स्वतः नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी करतील किंवा एखाद्या सुशिक्षित आणि चारित्र्यवान व्यक्तीला (पुरुष किंवा महिला) शिंदे गटाकडून उमेदवारी देतील.

नानकशेठ नेभनानी यांनी “मुर्तिजापुरच्या नागरिकांनी यावेळेस शिवसेना शिंदे गटाला साथ दिली, तर आम्ही मुर्तिजापुर शहराला नवी मुंबईसारखे आधुनिक स्वरूप देऊ, अशी हमी देतो,” असे स्पष्ट विधान सरकार माझा न्यूज सोबत बोलताना केले.

शहरात त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू असून, मुर्तिजापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना प्रारंभ होण्याचे संकेत मिळत आहेत.

✒️बातमी – प्रेमराज शर्मा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!