Join WhatsApp group

Ads

-

शेगावमध्ये तरुणीला ब्लॅकमेल लव जेहाद प्रकरण? आरोपीला अटक, तपासाला वेग

By Sarkar Maza

February 23, 2026 8:02 am

Ads


शेगाव (जि. बुलडाणा), दिनांक २३ :
शेगाव शहरात २१ वर्षीय तरुणीला मोबाईलद्वारे संपर्क साधून ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी मोहम्मद शाकीर (वय २६) याला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून वारंवार फोन व संदेश पाठवले. काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत तिचे फोटो व व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.


घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली. अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते सनी जंजाळ यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेण्यात सहकार्य केले.


शेगाव पोलीस स्टेशन येथे तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अत्याचार व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुरावे तपासले जात असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


दरम्यान, काही संघटनांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर कठोर कायद्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.
प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!