Join WhatsApp group

Ads

गद्रे ऑटोकॉनमध्ये लाखोंचा अपहार; शाखेतील मॅनेजरसह सहा जण अटकेत

By Sarkarmzanews

February 9, 2026 9:06 am

Ads

वाशिम : दिनांक ०९ : महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीची अधिकृत डिलरशिप असलेल्या गद्रे ऑटोकॉन प्रा. लि. मध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला असून वाशिम शाखेतील व्यवस्थापकासह सहा कर्मचाऱ्यांनी संगनमताने लाखोंची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांकडून जमा झालेली रोख रक्कम कंपनीच्या अधिकृत बँक खात्यात न भरता ती स्वतःच्या अथवा खाजगी खात्यांकडे वळविण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे कंपनीला एकूण ५ लाख ६४ हजार ८९९ रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात शाखा व्यवस्थापक पंकज रामकृष्ण सरदार (४६) याच्यासह अतुल अबचार, राहुल लांडगे, पियुष चौधरी, विजय कंकाळ आणि मिनाक्षी चौरपगार-हिवराळे यांचा समावेश आहे.

दरम्यान, १९ जानेवारी २०२६ रोजी शिवणी येथील मुख्य कार्यालयात वाशिम शाखेच्या डेली कॅश शीटची तपासणी करताना मोठी तफावत आढळली. सुरुवातीला लेखा त्रुटीचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र अंतर्गत ऑडिटदरम्यान ५ लाख २९ हजार ८९९ रुपयांची अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात कंपनीकडून देण्यात आलेला सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व सिमकार्ड परत न केल्याची बाबही समोर आली आहे.

व्यवस्थापक पंकज सरदार हा २० जानेवारीपासून कोणतीही माहिती न देता अनुपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित सिमकार्डचा गैरवापर झाला आहे का, याचा तपास सुरू आहे.

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीने ३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड, बँक व्यवहार आणि डिजिटल पुरावे तपासले जात असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दयाराम राठोड करीत आहेत.

या घटनेमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ उडाली असून कंपन्यांमध्ये अंतर्गत आर्थिक नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!