Join WhatsApp group

Ads

-

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ व्हायरल; सायबर कारवाईत पुण्यातून आरोपी अटकेत

By Sarkar Maza

February 15, 2026 8:11 pm

Ads

मुर्तिजापूर (दि. १५) : सोशल मीडियावर इंस्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहर येथे अपराध क्रमांक १४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७९, ३५१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(सी), ६७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे नमूद आहे.

गुन्हा दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.११ वाजता दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपी आकाश लक्ष्मण कांबळे (वय ३५, रा. पिंपरी चिंचवड, पुणे) याने इंस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून संबंधित महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ प्रसारित केले.


मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि नितीन राठोड, स.फौ. नंदकिशोर टिकर, पोकॉ पवन बोचरे, पोकॉ नामदेव आढे, पोकॉ गजानन खेडकर, पोकॉ सचिन दुबे तसेच सायबर टीम अकोला यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला.
सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने आरोपीचे लोकेशन निश्चित करून त्याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.

असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा झाल्यास तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर सेलशी संपर्क करा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!