Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर शहरात किराणा दुकानदाराकडून अवैध देशी दारू विक्री; नागरिक त्रस्त, राजकीय आडसाऱ्यामुळे कोणीच बोलायला धजावत नाही

By Sarkarmzanews

August 3, 2025 9:20 am

Ads

मूर्तिजापूर (३ ऑगस्ट २५) : शहरातील एका प्रमुख भागात असलेल्या किराणा दुकानातून चक्क अवैध देशी दारूचा व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या गैरकृत्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे सदर दुकानदाराचे आडनाव हे एका राजकीय कुटुंबाशी निगडीत असल्याने अनेक नागरिक या विषयावर उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. किराणा दुकानाच्या आडून चालणाऱ्या या अवैध धंद्यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत असून, सामाजिक आणि कौटुंबिक अशांततेला तोंड द्यावं लागत आहे.

“दुकानात सामान घ्यायला गेले, तर मागच्या बाजूने दारू विक्री सुरू असल्याचं बऱ्याच वेळा पाहिलं आहे. एका नागरिकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलं. या प्रकरणात पोलीस आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा हा विषय अधिक गभीर स्वरूप धारण करू शकतो.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!