Join WhatsApp group

Ads

-

*उष्मालाट व अवेळी पावसाची शक्यता* *दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन*

By Sarkar Maza

April 29, 2026 7:26 pm

Ads

अकोला, दि. २९ : जिल्ह्यात 29 एप्रिल ते दि. 3 मे दरम्यान उष्णतेची लाट राहील, तसेच या कालावधीत अवेळी पावसाची शक्यताही नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. या काळात नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे.

त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत सुचित करण्यात येत आहे. उष्मालाट असल्याने दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत,उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्था पासून शक्यतो दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.तहान

तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे.वीज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये.

पाऊस व विजांच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. शेतक-यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.कामगार व नागरिकांच्या संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजनाउष्मालाटेमुळे सर्वाधिक प्रभावित होणारे घटक म्हणजे बांधकाम कामगार, वीटभट्ट्या कामगार, खाणकाम, शेती आणि असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. त्यासाठी विविध विभाग, यंत्रणा, आस्थापनांनी कार्यस्थळावर उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. तीव्र उष्णलाटांपासून बचावासाठी कामाचे वेळापत्रक पुन्हा नियोजित करावे.

याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन कार्यवाही करावी.कार्यस्थळी उन्हापासून बचावासाठी पुरेशी व्यवस्था करावी. तसेच सदर ठिकाणी विश्रांती व्यवस्था करावी. आवश्यकतेनुसार कुलर व अनुषंगिक व्यवस्था सुनिश्चित करावी. पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट पूरक पदार्थ, आणि आपत्कालीन आईस पॅक उपलब्ध करून देण्यात यावे. कामगारांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधून करण्यात यावी.

उष्णतेचा ताण जाणवत असल्यास कामगारांना कामाचा वेग कमी करण्यास परवानगी देण्यात यावी.जड कामे दिवसातील थंड वेळेत होतील याबाबत नियोजन करावे.अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत कामासाठी दोन व्यक्तींच्या पथकाची अट (mandate) लागू करण्यात यावी. कार्यस्थळाजवळ विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि थंड पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी.

कामगार काम करीत असलेला भाग, ठिकाणे व सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या धोक्यांविषयी जनजागृती मोहिमा राबविण्यात यावी. असुरक्षित गटांवर विशेष लक्ष केंद्रित करावे: बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, दैनंदिन मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगार.जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व प्रामुख्याने उपसंचालक औदयागिक सुरक्षा, सहायक आयुक्त कामगार कल्याण यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!