Join WhatsApp group

Ads

--

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

By Sarkarmzanews

January 19, 2025 11:18 am

Ads

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,

वाशीम : हसन मुश्रीफ,

सांगली : चंद्रकांत पाटील,

नाशिक : गिरीश महाजन,

पालघर : गणेश नाईक,

जळगाव : गुलाबराव पाटील,

यवतमाळ : संजय राठोड,

मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,

रत्नागिरी : उदय सामंत,

धुळे : जयकुमार रावल,

जालना : श्रीमती पंकजा मुंडे,

नांदेड : अतुल सावे,

चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,

सातारा : शंभूराज देसाई,

रायगड : कु.आदिती तटकरे,

लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,

नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे,

सोलापूर : जयकुमार गोरे,

हिंगोली : नरहरी झिरवाळ,

भंडारा : संजय सावकारे,

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,

धाराशिव : प्रताप सरनाईक,

बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),

सिंधुदुर्ग : नितेश राणे,

अकोला : आकाश फुंडकर,

गोंदिया : बाबासाहेब पाटील,

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,

वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि

परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!