Join WhatsApp group

Ads

६ जुगारी आरोपींकडून २.२० लाख रुपयांचा माल जप्त

By Sarkarmzanews

July 8, 2025 5:52 am

Ads

अकोट फैल पोलिसांना दुर्गा नगर परिसरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धडक कारवाई करत ६ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख २० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर लगाम घालणे हा आहे.

पोलिस निरीक्षक शेख रहीम यांच्या सूचनेनुसार डीबी पथकाने छापा टाकला. अटक केलेल्या आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

दोन दुचाकी – अंदाजे किंमत ₹१,६०,०००

पाच मोबाईल फोन – अंदाजे किंमत ₹५३,०००

रोख रक्कम – ₹७,५००

सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अनिस पठाण, योगेश काटकर, संतोष चिंचोलकर, इम्रान शाह, गिरीश तिडके, हर्षल श्रीवास, अमीर आदी पोलिस कर्मचारी सहभागी होते.कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!