Join WhatsApp group

Ads

“घाटे–गाडेकरांचा सुळसुळाट; मुर्तिजापूर भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची अडवणूक”

By Sarkarmzanews

December 31, 2025 12:48 pm

Ads

मुर्तिजापूर: दिनांक ३१: मुर्तिजापूर येथील भूमिअभिलेख कार्यालयात ‘घाटे’ व ‘गाडेकर’ नावाचे दोन दलाल खुलेआम सक्रीय असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.

या दोघांना भेटल्याशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना थेट अधिकाऱ्यांऐवजी दलालांमार्फतच व्यवहार करावा लागत असल्याची चर्चा आहे.

जमीन मोजणी, नोंद दुरुस्ती, फेरफार, सातबारा संदर्भातील कामे दलालांच्या ‘होकारा’नंतरच मार्गी लागतात, असा आरोप केला जात आहे.

परिणामी, कामासाठी आलेल्या नागरिकांची आर्थिक लूट होत असून वेळेचीही नासाडी होत आहे.

विशेष म्हणजे, या दलालांची कार्यालय परिसरात मोकळेपणाने वावर असून संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

“दलालांशिवाय काम होत नसेल तर कार्यालयाचा उपयोग काय?”

असा सवाल उपस्थित केला जात आहे.या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दलालांवर कारवाई करावी, तसेच कार्यालयातील पारदर्शकता वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

तसेच वरिष्ठ संबंधित अधिकारी वर्गाने जातीने लक्ष घालून या वर आढा घालावा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!