Join WhatsApp group

Ads

अकोल्यातील रणपिसे नगरमध्ये माजी उपअभियंता संजय यश कौशल यांची निघृण हत्या – पोलीसांनी केली आरोपीला एका तासात अटक

By Sarkarmzanews

June 3, 2025 11:56 am

Ads

दिनांक ०३ जून २५ : अकोला -: शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार २ जून रोजी रात्री कुदळीने डोक्यात प्रहार करून एका व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव संजय यश कौशल असून आरोपी महेंद्र पवार फरार आहे. पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

अकोला शहरातील गजबजलेल्या आणि वस्तीवाढीच्या टप्प्यावर असलेल्या रणपिसे नगर जागृती शाळेजवळील परिसरात सोमवार २ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेली ही थरारक हत्या संपूर्ण परिसराला हादरवून गेली. संजय कौशल (फ्लॅट नं. ३०२) हे मुरलीधर टॉवरमध्ये राहत होते, तर आरोपी महेंद्र पवार (फ्लॅट नं. ३०६) हा देखील याच इमारतीत राहतो. दोघांमध्ये आधीपासूनच किरकोळ वाद होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

रात्री ८ वाजता पुन्हा एकदा वाद उफाळून आला. आधीच्या भांडणात हाणामारी झाली आणि अचानक महेंद्र पवारने ताब्यातील कुदळीने संजय कौशल यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात संजय कौशल खाली कोसळले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या खून प्रकरणानंतर आरोपी महेंद्र पवार घटनास्थळावरून फरार झाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी सिव्हिल लाईन पोलीस सक्रिय झाले. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आणि गुन्हे शाखा तपासासाठी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अखेर आरोपी महेंद्र पवार यास अटक केली असून फॉरेन्सिक तपासाद्वारे हत्येच्या आधी आणि नंतरच्या घटनाक्रमाचा तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वादाचे नेमके कारण वैयक्तिक व शेजारी संबंधांतील वाद असल्याचे सांगितले जात आहे. . घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारची हत्या घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मुरलीधर टॉवर सारख्या निवासी संकुलात देखील सुरक्षा यंत्रणेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष समोर येत आहे. पोलीस खात्याने लवकरात लवकर आरोपीला अटक करावी आणि परिसरात सतर्कता वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Article

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!