Join WhatsApp group

Ads

-

मधापुरीत बनावट सह्यांचा स्फोटक प्रकार!सरकारी शिवण मशीन योजनेत फसवणुकीचा प्रयत्न; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

By Sarkar Maza

February 19, 2026 6:55 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक १९: मूर्तिजापूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मधापुरी येथे सरकारी योजनेतून लाभ उचलण्यासाठी बनावट सह्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गावात मोठी खळबळ उडाली आहे. शिवण मशीन योजनेत लाभ मिळवण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांच्या बनावट सह्या करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी मधापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय?

तक्रारीनुसार, अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा वासनिक यांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी पंचायत समिती, मूर्तिजापूर येथे सादर करण्यात आलेल्या अर्जावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या खोट्या सह्या केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कागदपत्रांची पडताळणी करताना उघडकीस आल्याचे सांगितले जाते.

ग्रामपंचायत मधापुरी अंतर्गत काही नावांचा वापर करून शिवण मशीन योजनेचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात लाभार्थी पात्र नसताना कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शासनाची फसवणूक?

या प्रकारामुळे केवळ ग्रामपंचायत प्रशासनाची नव्हे तर थेट शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारी योजनांमध्ये अशा प्रकारे कागदोपत्री बनावटगिरी होत असल्यास सामान्य पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण होते.

नागरिकांमध्ये संताप

या घटनेनंतर मधापुरी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “सरकारी योजनांचा लाभ खऱ्या गरजूंना मिळायला हवा; बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

पोलिस तपासाकडे लक्ष

सदर प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, दोषींवर कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल होतो आणि प्रशासन कोणती कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारी योजनांतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणातून नेमके सत्य काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!