Join WhatsApp group

Ads

--

लाडक्या शेतकऱ्यांचा वाढल्या लाडक्या मुख्यमंत्री पासून अपेक्षा – वीज पुरवठा दिवसा सुरु ठेवण्याची मागणी.

By Sarkarmzanews

December 7, 2024 7:51 pm

Ads

प्रेमराज शर्मा : दिनांक ०७ : परत नव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथ विधी संपन्न झाला, या मुळे शेतकरी वर्गा मध्ये पण उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणी सोबत या वेळेस लाडक्या शेतकर्याने भरभरून महायुतीला साथ दिल्याचे या निवडणुकीचा निकालात पाहायला मिळाले.

सध्या मुर्तीजापुर तालुक्यात शेती साठी लागणारा वीज पुरवठा दिवसा बंद आहे, या मुळे शेतकरी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री शेतकरीला शेतात जाऊन पंप सुरु करण्यासाठी जावे लागते.

थंडीचे दिवस असल्यामुळे शेतात जाण्यासाठी तालुक्यातून गावा कडे भर थंडीत प्रवास करून पंप सुरु करणे व पिकांना पाणी देणे, थंडीचा वेळेस पाणी देताना वयोवृद्ध शेतकर्यांना याचे जास्तीच त्रास सहन करावे लागते.

तसेच रात्रीचा अंधारात जंगली जनावरांचा धोका सुद्धा असतो. अश्या अनेक समस्या सध्या लाडक्या शेतकऱ्या समोर आहे.

तरी लाडक्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या शेतकऱ्याची छोटीशी समस्या दूर करावी अशी मागणी मुर्तीजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी आमदार हरीश पिंपळे मुख्यमंत्री यांचा सोबत या विषया वर चर्चा करण्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!