Join WhatsApp group

Ads

पुरवठा विभागात समान न्याय की निवडकांना प्राधान्य? समाधान शिबिरानंतर प्रश्नचिन्ह

By Sarkar Maza

August 6, 2026 9:28 pm

Ads

मुर्तिजापूर पुरवठा विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काही विशिष्ट समाजाशी संबंधित दलाल विभागात सक्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या दलालांच्या माध्यमातून काहींची कामे अल्पावधीत होत असल्याची, तर सर्वसामान्य नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रेशनकार्ड, नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, दुरुस्ती तसेच इतर पुरवठा विभागाशी संबंधित कामांमध्ये दलालांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप आहे.

त्यामुळे शासनाच्या पारदर्शक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.अलीकडे पार पडलेल्या समाधान शिबिरातही काही विशिष्ट समाजातील नागरिकांची कामे प्राधान्याने झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.

या आरोपांमुळे शिबिराच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करून, दलालांवर कठोर कारवाई करावी तसेच सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

(टीप : या वृत्तातील उल्लेख हे नागरिकांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आधारित असून, संबंधित अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही प्रसिद्ध करण्यात येईल.)

फोटो – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!