Join WhatsApp group

Ads

-

अकोला शिक्षक बदली घोटाळा : 33 शिक्षक निलंबित; निलंबित शिक्षकांची यादी जाहीर, सरकार माझा न्यूज वर

By Sarkar Maza

August 6, 2026 1:57 pm

Ads

बनावट दिव्यांग व परित्यक्ता प्रमाणपत्रांच्या कथित गैरवापरप्रकरणी धडक कारवाई; आणखी कारवाईची शक्यता

अकोला | प्रतिनिधी

अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई करत 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. बदली प्रक्रियेत बनावट दिव्यांग, परित्यक्ता तसेच इतर कागदपत्रांचा कथित गैरवापर झाल्याच्या आरोपांनंतर झालेल्या चौकशीत अनेक शिक्षक दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, यापूर्वी 65 शिक्षकांची वेतनवाढही रोखण्यात आली आहे. या प्रकरणात फौजदारी कारवाईचीही मागणी होत असून, तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निलंबित शिक्षकांची यादी :

चंद्रशेखर द्वारकाप्रसाद दिक्षीत,कु. श्वेता हेमंतराव खुमकर,संतोष महादेव पाचपोर,वंदना रंगलाल राठोड,रविंद्र महादेव ढोकणे,कु. वैशाली रामराव लोणकर,स्वप्नाली पोतदार,सिमा नजम मोहम्मद इब्राहिम मोहम्मद, फैसल शेख भोलू अन्सारी,आशा उत्तमराव मालधुरे,संदीप सहदेव महल्ले,विजय दामोदर भांडे,प्रेमा मोहनप्रसाद दुबे,सोनल बंद्रकांत पाऊलझगडे,महेंद्र सुधाकर धनोकार,प्रतिभा विजय भांडे,सौ. विद्या सुनील आखरे,नरेंद्र किसनराव इंगळे,शितल नागोराव टापरे,देवानंद आनंदराव मोरे,उज्वला नरेंद्र इंगळे,कु. मनिषा रामेश्वर सूर्यवंशी,रेणुका साहेबराव बाबर,कृपाली शेंडोकार,वर्षा नागसेन गोपनारायण,इमरान हुसेन इरफान हुसेन,भारती अविनाश वसिनिक,रुपाली नितीन माळोदे,वैदेही विनोद वैद्य,वैशाली लक्ष्मणराव देशमुख,अमनिषा काकड,दिपाली जाधव,मिनाक्षी आपोतीकर.

या कारवाईनंतर शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!