Join WhatsApp group

Ads

गणपती मंदिर परिसरात आढळला विषारी नाग; सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून जंगलात सोडला..!

By Sarkar Maza

August 6, 2026 6:09 pm

Ads

मूर्तिजापूर/प्रतिनिधी:-

शहरातील टावरी हॉस्पिटलजवळील गणपती मंदिर परिसरात विषारी साप आढळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील नागरिक गौरव मोरे यांनी तत्काळ सर्पमित्र जयकुमार ग्याने यांच्याशी संपर्क साधून साप असल्याची माहिती दिली.माहिती मिळताच सर्पमित्र जयकुमार ग्याने व प्रेम बैतूले यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी अत्यंत शांतपणे आणि कौशल्याने इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा (नाग) या विषारी सापाला सुरक्षितरित्या पकडले. त्यानंतर वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने त्या सापाला नैसर्गिक अधिवासात, जंगल परिसरात सुरक्षित सोडण्यात आले.या धाडसी आणि तत्पर बचावकार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तसेच सर्पमित्रांच्या कार्याचे कौतुक करत नागरिकांनी त्यांचे आभार मानले.सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की, घर किंवा परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा सापाला इजा करण्याचा प्रयत्न न करता त्वरित प्रशिक्षित सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधावा. त्यामुळे नागरिकांची तसेच वन्यजीवांची सुरक्षितता राखण्यास मदत होईल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!