Join WhatsApp group

Ads

मतदारयादीच्या विशेष पडताळणी (SIR)मुळे २१ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

By Sarkar Maza

August 4, 2026 12:25 am

Ads

मुंबई | प्रतिनिधी | अमर तळोकार

महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेमुळे तब्बल २१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

सुमारे दोन दशकांपासून पोलिसांना चकवा देणारा नाशिकमधील व्यावसायिक अवधूत चाफेकर (वय ६५) अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००५ मध्ये सुमारे ९ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात चाफेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

मात्र, त्यानंतर तो सतत फरार राहून पोलिसांना चकवा देत होता.तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, चाफेकर गेल्या २१ वर्षांपासून नाशिकमध्ये आपली खरी ओळख लपवून राहत होता. संशय येऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या नावावर कधीही मोबाईल कनेक्शन घेतले नाही.

तसेच, इतरांच्या ओळखपत्रांचा वापर करून तो आपली ओळख लपवत होता. या काळात त्याने नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसायही उभा केला होता.

दरम्यान, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान मतदारांची घरोघरी जाऊन सखोल पडताळणी केली जात आहे.

२००२ नंतर प्रथमच राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.याच मोहिमेदरम्यान चाफेकरने जुन्या मतदार यादीतील आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली. मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्याने निवडणूक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

चाफेकर एका हॉटेलमध्ये चेक-इन करताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.अटकेनंतर चाफेकर याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, मतदारयादीच्या सखोल पडताळणी मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून फरार असलेला आरोपी कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने या मोहिमेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Related Article

सामान्य जनतेचा विश्वास जिंकत जिंकत… ‘सरकार माझा न्यूज’ने गाठला १ लाख सक्रिय वाचकांचा मैलाचा दगड

बाळापूर पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणातील फरार पोलीस शिपाई नांदेडमधून अटक; अकोला पोलिसांची २० दिवसांची शोधमोहीम यशस्वी

बंजारा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

मुर्तिजापूरमध्ये विकासापेक्षा गटबाजीला अधिक महत्त्व? नागरिकांचा सवाल

बनावट चावी बनवून शेजाऱ्याच्याच घरात चोरी; एलसीबीने काही तासांत आरोपीला जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अण्णाभाऊ साठे जयंती रॅलीचे संस्थापक गजानन तायडे यांच्या सामाजिक विचारांचा वटवृक्ष; ‘तीक्ष्णगत’ संस्थेतून गरजू बालकांना अन्नधान्याची मदत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!