Join WhatsApp group

Ads

दिपक दांदळे यांची sswf च्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती

By Sarkarmzanews

February 5, 2026 10:26 pm

Ads

मुर्तिजापुर : मुर्तिजापूर शिवसेना तालुका प्रमुख दिपकदादा दांदळे यांची सैनिक शेतकरी वेलफेयर फाऊंडेशन च्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 4 फेब्रुवारी बुधवार रोजी रोकडे मंगल कार्यालय , पत्रकार कॉलनी अकोला येथे संपन्न झालेल्या sswf वराड विभागीय आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्ती चे पत्र देवून पदभार सोपविण्यात आला.

सैनिक शेतकरी यांच्या उत्कर्षासाठी कार्य करणाऱ्या आणि या संस्थे द्वारे ग्रामिण भागतील गोरगरीब जनतेचा जिवनमान आणि आर्थिक स्थर उंचवण्याच्या उद्देशाने तसेच संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आरोग्य सेवा, कृषी, रोजगार, शिक्षण , प्रशिक्षण , अशा असंख्य सामाजिक सुविधा निर्माण करण्यासाठी तालुका प्रमुख पुरुष आणि तालुका प्रमुख महिला तसेच विभाग प्रमुख , केंद्र प्रमुख अशा नियुक्त्या करुन ही बांधणी करण्यात येणार आहे.

आक्रमक शैली आणि शिवसेना च्या बाणेला शोभणारी धडाडी अंगी असणारे दिपकदादा दांदळे यांचे आता सामाजिक क्षेत्रात त्यांच्या मोठ्या कार्याची झलक या sswf माध्यमातून दिसून येणार आहे.

सैनिक शेतकरी वेलफेयर फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष मा. श्री मनोजकुमार डांगे , उपाध्यक्ष मा. श्री निलेश निकम आणि सचिव मा. श्री. संजय सतई यांच्या उपस्थितीत आणि सामाजिक कार्यकर्ते जिल्हा समन्वयक मा. श्री.रामदास हरणे , स्वामी विवेकानंद युथ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष अनिल डाहेलकर , नव नियुक्त महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई संजय बगाडे यांच्या उपस्थितीत श्री. दिपक दादा दांदळे यांना जिल्हाध्यक्ष चे नियुक्त पत्र बहाल करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!