Join WhatsApp group

Ads

-

मकर संक्रांतीचा सणाच्या उत्सवात जीवघेणा खेळ; चायनीज मांजावर नियंत्रण कुठे?

By Sarkarmzanews

January 14, 2026 3:59 pm

Ads

मुर्तिजापूर: दिनांक १४ : आज मकर संक्रांत पतंग उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्याचा उत्साह दिसून येत आहे. मात्र

मात्र या उत्सवाला काळी किनार ठरणारा प्रकार म्हणजे चायनीज मांजाचा सर्रास वापर. विशेष म्हणजे लहान मुलेही निर्भयपणे हा घातक मांजा वापरताना आढळून येत आहेत.

चायनीज मांजा अतिशय धारदार असल्याने गळा, हात, पाय कापले जाण्याच्या घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

यापूर्वीही या मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्षी गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

शासनाने चायनीज मांजावर बंदी घातलेली असतानाही खुलेआम विक्री व वापर सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!