Join WhatsApp group

Ads

राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला हातभार –विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

By Sarkar Maza

April 17, 2026 7:00 pm

Ads

तळेगाव (ता. दिंडोरी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने जि. प. शाळा, तळेगाव येथे दि. 17 एप्रिल 2026 रोजी एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

मा. श्री. राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त डीएसएफ (DSF)च्या वतीने शाळेतील 160 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षणाबाबतची त्यांची उत्सुकता अधिकच वाढली.कार्यक्रमाला गावातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सरपंच सोनाली चारोस्कर, अशोक दुधारे, अशोक कदम, दीपक निकम, ज्योती निकम, अविनाश ढोली, विजया दुधारे तसेच माजी सरपंच अजय चारोस्कर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि नियमित अभ्यास करण्याचे आवाहन केले.या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वह्यांचे वाटप न करता विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या झाडांच्या बियांचे संकलन करून ‘वृक्ष लागवड आणि संवर्धन’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून पाठबळ दिले.

लहान वयातच पर्यावरण संवर्धनाची सवय लागावी, या हेतूने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक कांतीलाल भरसट यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत व्यक्त केले.

त्यांनी डीएसएफ आणि सर्व मान्यवरांचे आभार मानत, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंदाने विशेष मेहनत घेतली. धनंजय आहेर, अशोक देवरे, पुष्पा जगताप, कुंदा निकम, माधुरी थोरात, ज्योती अहिरे, पल्लवी गांगोडे आणि रोहिणी परदेशी यांनी नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडल्या.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, उत्साह आणि सहभाग यांचे सुंदर चित्र या कार्यक्रमातून पाहायला मिळाले.ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे आवश्यक शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत वह्यांचे वाटप हा उपक्रम केवळ मदत नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला बळ देणारा ठरतो.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो.एकीकडे शिक्षणाला चालना देताना दुसरीकडे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद निर्माण होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!