Join WhatsApp group

Ads

--

रेल्वेच्या निष्काळजी सेवेला ग्राहक आयोगाचा दणका; अ‍ॅड. शिवम शर्मा यांचा सामान्य प्रवासी म्हणून विजय

By Sarkarmzanews

January 7, 2026 9:06 am

Ads

अकोला : दिनांक ०७: रेल्वेच्या निष्काळजी सेवेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला यांनी जोरदार चपराक दिली आहे. अ‍ॅड. शिवम सतीश शर्मा यांनी सामान्य प्रवासी म्हणून दाखल केलेल्या तक्रारीत आयोगाने भारतीय रेल्वे (सेंट्रल रेल्वे) यांना सेवेत न्यूनता केल्याबद्दल दोषी ठरवले.

नागपूर–अकोला प्रवासादरम्यान आझाद हिंद एक्सप्रेस तब्बल आठ तास उशिराने येऊनही प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने तक्रारदारास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.

आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत रेल्वेला ₹15,000 नुकसानभरपाई, ₹215 तिकीट परतावा व ₹2,000 न्यायिक खर्च, तसेच 9% व्याजासह 45 दिवसांत रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.हा निकाल सामान्य प्रवाशांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!