Join WhatsApp group

Ads

काँग्रेस स्वातंत्र्यसैनिक सावरकरांचा अपमान करत आहे : आमदार सावरकर

By Sarkarmzanews

May 29, 2025 6:28 pm

Ads

दिनांक २९ : अकोला : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान अपमान करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून राहुल गांधी यांना न्यायालयाने आदेश दिलावर सुद्धा आपल्या वागणुकीमध्ये बदल करत नाही आजही वि दा सावरकर यांची विचार देशाला गरजेचे असून राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी उत्कृष्ट राजे तसेच धर्म संस्कृती सोबत मानवते सहकार्य केलं त्यामुळे 300 वर्षानंतर सुद्धा आज प्रत्येक तीर्थस्थळावर त्यांची आठवण येते त्यांचं स्मरण केल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही ही आदर्श राजाची राजमाताची कृती असल्याची प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


भारतीय जनता पार्टी कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर श्री शताब्दी जयंती निमित्त तसेच स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर प्रभावी व्यक्तिमत्व या विषयावर आयोजित अभियंता, बुद्धिवंत विधी तज्ञ यांच्या संयुक्त संमेलनात भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष शिवरकर हे होते यावेळी खासदार अनुप धोत्रे डॉक्टर रणजीत सपकाळ डॉक्टर अजय सिंग चव्हाण एडवोकेट सत्यनारायण जोशी अभियंता शामसुंदर साधवांनी प्राध्यापक मोहन खडसे डॉक्टर गजानन कहे विजय अग्रवाल जयंत मसने एडवोकेट देवाशिष काकड सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर राजेश देशपांडे पवन महल्ले संजय गोटफोडे, रमेश अल्करी चंदन शर्मा माधव मानकर योगेश अग्रवाल रमण पाटील, शैलेश फुलकर, वैभव सुरलकर, गणेश ताडे आदी मंचावर विराजमान होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते वि दा सावरकर व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी खासदार धोत्रे यांनी भारतीय जनता पक्षाने देशभरात अहिल्याबाई होळकर यांची वर्ष शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून समाज आणि संस्कृती राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या राजमाताला अभिवादन केले असून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज असून होळकर घराण्याचा देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असून संस्कृती संवर्धनाचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे.

ते इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे त्यांना अभिवादन करणे प्रत्येक राष्ट्रभक्तांचे कर्तव्य आहे तसेच वि दा सावरकर यांनी आजीवन कारावास बघून एका कोठडीमध्ये 14 वर्ष राहून त्याग बलिदान, प्रेरणादायी कार्य केले त्यांच्या गीताला संभाजी संभाजी महाराज यांच्या स्मृती मध्ये महाराष्ट्र सरकारने प्रथम पुरस्कार देऊन देशभक्तीचेता जागृतीच्या कार्याला नमन केले आहे त्यांच्या जयंतीनिमित्त व भारतीय जनता पक्षाच्या तीन वेगवेगळ्या आघाड्यांनी हा अभिनव पूर्ण कार्यक्रम करून सामाजिक क्षेत्रातील बुद्धिवंतांचे विचार आदान प्रदान करण्याचे काम केले आहे हे दिशादर्शक कार्य असल्याचे यावेळी सांगितले यावेळी प्राध्यापक मोहन खडसे एडवोकेट सत्यनारायण जोशी, सागवानी जयंत मसने, विजय अग्रवाल यांची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचा संचालन एडवोकेट देवाशिष काकड तर शैलेश फुलकर यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन गणेश ताडे यांनी केले. मोठ्या संख्येने शहरातील विविध भागातील मान्यवर उपस्थित होते.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!