Join WhatsApp group

Ads

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

By Sarkar Maza

June 3, 2026 12:49 pm

Ads

मुर्तिजापूर शहरातील स्टेशन परिसर, टेलिफोन कॉलनी, गणेश नगर व आसपासच्या भागात जनावरांच्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या घटनांमध्ये अद्याप ठोस यश न मिळाल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दूध व्यवसाय करणारे अनवर खान (पत्रकार) यांची 2023 ते 2026 या कालावधीत 10 दुधाळ गाई व 1 मोठे वासरू, व 28 बकऱ्या अशी एकूण 39 जनावरे चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय श्री शितोळे यांच्या 5 गाई, श्री पाचडे यांच्या 8 गाई, फुरकान काझी यांची 1 गाय, भास्कर मोरे यांच्या 2 गाई, विजय यादव यांच्या 4 ते 5 गाई व बैल, तसेच मोहम्मद हयात यांच्या 4 गाई चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे.एकाच परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणात जनावरे चोरीला जात असताना चोरट्यांचा माग काढण्यात पोलीस यंत्रणेला यश का येत नाही, असा सवाल आता पशुपालकांकडून केला जात आहे.

जनावरे हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना संबंधित यंत्रणा नेमके काय करत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, काही शेतकरी व पशुपालकांनी डीबी पथकाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

जनावरचोरीच्या घटनांचा छडा लावण्याऐवजी डीबी पथक अकोला-मुर्तिजापूर अप-डाऊन करण्यातच व्यस्त आहे का? त्यांच्या उपस्थिती, कर्तव्यपालन आणि HRA संदर्भातील बाबींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

तसेच, जनावरांच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत. “या चोरीमागे एखादे संघटित रॅकेट कार्यरत आहे का?”, “चोरी गेलेल्या जनावरांचा पुढे नेमका काय उपयोग केला जातो?” असे प्रश्न पशुपालक उपस्थित करीत आहेत.

काही नागरिकांनी शहरात सुरू असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या कथित अवैध कत्तलीच्या प्रकारांबाबत संबंधित यंत्रणांनी तपास करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

या बाबींची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”चोरी होते, तक्रारी होतात, पण निष्कर्ष दिसत नाही.

चोर मोकाट आणि पशुपालक हवालदिल,” अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

(टीप : वरील माहिती, आरोप, शंका व मागण्या संबंधित पशुपालक आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या दाव्यांवर आधारित आहेत. त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल.)

न्यूजफोटो – AI Genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!