Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापुरात जातीय शिवीगाळ व मारहाण; अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

By Sarkarmzanews

February 5, 2026 9:09 am

Ads

मुर्तिजापुर | प्रतिनिधी | दिनांक ०५ |

मुर्तिजापुर शहरात बांधकामाच्या कामावरून झालेल्या वादातून जातीय शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप. क्र. 131/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम 118(1), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कलम 3(1)(r)(s) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी प्रतिक दिनेश तायडे (वय 26), रा. महाकाली नगर, मुर्तिजापुर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3.15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आजोबा व आई यांच्या नावे असलेल्या प्लॉट क्रमांक 53 (सर्वे क्र. 168/1/ब/53) येथे घर बांधकामासाठी जेसीबीद्वारे खड्डे खोदण्याचे काम सुरू होते.

त्यावेळी जितेंद्र महादेवसा गुल्हाणे (वय 55, रा. देवका नगरी, ता. मुर्तिजापुर) हे घटनास्थळी येऊन जेसीबी चालकाला काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याचे माहिती असूनही आरोपीने जातीय स्वरूपाची शिवीगाळ करून जेसीबी मालकास धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादीच्या जबाबावरून सायंकाळी 6.49 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये:

  • अप. क्र. 215/2009 – IPC कलम 325, 504, 506, 34
  • अप. क्र. 235/2006 – IPC कलम 353, 186, 504, 34
  • अप. क्र. 196/1997 – IPC कलम 448, 506, 323

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत असून, गुन्हा नोंद अधिकारी एएसआय गजानन थाटे आहेत. पोलिसांनी कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!