Join WhatsApp group

Ads

-

स्वाती कंपनीचा करार रद्द: शिवसेना उबाठा तर्फे अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप व जल्लोष,

By Sarkarmzanews

January 2, 2025 5:03 pm

Ads

दि. ०२ : अकोला : महानगरपालिकेचा स्वाती इंडस्ट्रीजसोबतचा करार रद्द झाल्याचा जल्लोष शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी,कार्यकर्त्यांनी आज दिनांक 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता महापालिका आवारात फटाके फोडून आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप करून करावरील शास्ती माफीचीही मागणी करीत जल्लोष केला.

शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी अनेकदा आंदोलने करून स्वाती कंपनी सोबत केलेला करार हा अवैध असून आपल्या मनपा कडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ असून फुकटचे कमिशन स्वाती कंपनीला दिले. जात आहे त्यामुळे हा करार रद्द करावा अशी मागणी अनेकदा केली गेली आहे. यासाठी शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी शहरात गल्लीबोळात फिरून स्वाती कंपनी ला शहरातील लोकांनी वसुली देऊ नये असे आवाहन करताना प्रथम स्वाक्षरी अभियान चालविले. त्यानंतर पत्रके घरोघरी वाटून जनतेला आवाहन केले होते. मात्र कुण्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

मात्र प्रशासक आणि मनपा आयुक्त डॉ लहाने यांनी वसुली समाधान कारक नसल्याचे सांगत करार पत्रात नमूद तरतुदी चे पालन केले गेले नसल्याचे कारण देत स्वाती कंपनी सोबतचा करार रद्द केला आहे ही गोड बातमी शहरातील नागरिकांना मिळताच शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी मनपा आवारात फटाके फोडून. आणि मनपा अधिकारी विजय पारतवार आणि उपायुक्त यांचा सत्कार करून जल्लोष साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना लाडू वाटप केले.

महापालिका उप आयुक्त (प्रशासन) गीता ठाकरे यांना भेटून मिश्रा यांनी मार्च 2025 पर्यंत कर वसुलीवर शास्ती माफ करण्याची योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी नागरिकांना टॅक्स भरण्यात दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मिश्रा यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला नागरिक हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन करत, “जनतेच्या समस्यांची सोडवणूक आणि प्रलंबित कर मुद्द्यावर उपाययोजना हीच खरी सेवा आहे,” असे मत व्यक्त केले. .महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.यावेळी तरूण बगेरे,मंगेश काळे ,सुरेंद्र विसपुते,अनिल परचुरे,अंकुश शिंत्रे,प्रकाश वानखडे ,रुपेश ढोरे, अविनाश मोरे,बाळू पाटील , संजू अण्णा फुललेलू, गणेश बुंदेले,गोपाल लव्हाळे, नितीन देशमुख,शैलेश अधुरेकर,रोशन राज,देवा गावंडे, पंकज बाजोड ,विजय तिखिले,राजेश कानापुरे,मंगेश पावले ,योगेश गीते, आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!