Join WhatsApp group

Ads

-

जीवनासाठी आणि मुक्या पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या प्रतिबंधित ‘नायलॉन मांजा’ (चायना मांजा) विरोधात अकोला पोलिसांनी मोठी कारवाई

By Sarkarmzanews

December 30, 2025 6:48 pm

Ads

मा श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांनी दिलेल्या निर्देशा नुसार ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्हयात मानवी जीवनासाठी आणि मुक्या पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या प्रतिबंधित ‘नायलॉन मांजा’ (चायना मांजा) विरोधात अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कृषी नगर अकोला, भागात छापा टाकून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ५४ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.

अकोला येथील कृषी नगर परिसरात एका किराणा दुकानातून बंदी असलेल्या नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने सापळा रचला आणि पंचांच्या उपस्थितीत सदर

दुकानाची झडती घेतली. यावेळी दुकानात लपवून ठेवलेला ‘चायना मांजा’ मोठ्या प्रमाणात मिळून आला. आरोपींची नामे १) गोपाल रामदास लाहे (वय ३० वर्षे, रा. भीम नगर, अकोला) २) मनिष बाबाराव खाडे (वय २५ वर्षे, रा. भीम नगर, अकोला), पोलिसांनी दरम्यान खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे: MONO KTC कंपनीचे ५१ बंडल (किंमत ५१,००० रु.) MONO KTC FIGHTER कंपनीचे ३ बंडल (किंमत ३,००० रु.), एकूण किंमतः ५४,००० रुपये. या दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११०, २२३, ३(५) आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ४ व १५ नुसार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चायनिज मांजा शहरामध्ये पंतग उडविण्याकरीता वापरल्यामूळे दुचाकी चालक, पादचारी तसेच पशु पक्षी इत्यांदीचा जिव जाण्या इतपत गंभिर दुखापती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे प्रतिबंशीत नायलॉन मांजा विक्रेते अपणास आढळून आल्यास त्यांचबाबत माहीती देण्यास अकोला जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

सदस्ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अचिंत चांडक, अपर पोलीस अधिक्षक मा. बी. चंद्रकांत रेही मा.श्री. शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो उपनि विष्णू बोडखे, ग्रेड पो उपनी ठाकरे पोहेकी किशोर सोनोने वसीमोद्दीन महेंद्र मलिये एआज अहमद पोका अशोक सोनवणे मपोहेका स्वाना, स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!