Join WhatsApp group

Ads

कुरुम येथे पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त पथनाट्यातून जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन, नशामुक्ती व रस्ते सुरक्षेवर विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण

By Sarkarmzanews

January 9, 2026 4:20 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक ०९ :महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून माना पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला.

ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी कुरुम येथील इतवारा चौकात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात कुरुम येथील पंचशील हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

वाढती अंधश्रद्धा, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम तसेच वाहन चालविताना सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे होणारे अपघात या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले.पथनाट्यातून विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. व्यसनामुळे कुटुंबांवर होणारे दुष्परिणाम वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्यात आले.

तसेच दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर हा जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक असल्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास कुरुम परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे तसेच पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. पोलीस प्रशासन समाजप्रबोधनासाठीही सक्रिय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाचे नियोजन माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाल्याचे चित्र दिसून आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!