Join WhatsApp group

Ads

पतंग पकडण्याच्या नादात उघडी विहीर ठरली मृत्यूचा सापळा; ५.३० वाजता पडलेला बालक ७ वाजता मृत बाहेर

By Sarkarmzanews

January 19, 2026 7:19 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १९ : मुर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरात परदेशीपुरा येथे आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

पतंग पकडण्याच्या नादात शेख उमर शेख शकील(वय ११वर्ष) नावाचा एक बालक तोल जाऊन उघड्या विहिरीत पडला.घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

तसेच गाडगे बाबा आपत्कालीन पथक, पिंजर आणि संत गजानन महाराज संस्थेच्या सहकार्याने बचाव कार्य सुरू करण्यात आले. सुमारे दीड तास सतत चाललेल्या शोध व बचाव कार्यानंतर सायंकाळी ७ वाजता बालकाला खोल विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

यानंतर त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून उघड्या विहिरीमुळे निष्पाप जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!