Join WhatsApp group

Ads

गुटख्याविरुद्ध अमरावती पोलिसांची मोठी कारवाई: १०.४३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकजण अटकेत

By Sarkarmzanews

May 30, 2025 8:52 pm

Ads

दिनांक ३० मे २०२५ : अमरावती शहरात नुकतेच रुजू झालेले नवे पोलीस आयुक्त श्री. अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गुटख्याविरुद्ध सर्वात मोठी कारवाई करत तब्बल १०,४३,८६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. गुटख्याचा साठा रामपुरी कॅम्प येथील एका राहत्या घरात आढळून आला असून, या प्रकरणी राजेश भगवानदास केसवाणी (वय ५०) याला पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ च्या पथकाने पो.स्टे. गाडगेनगर हद्दीत गस्त घालणाऱ्या दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना माहिती देत पंचासमवेत छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये आरोपीच्या दोन खोल्यांमध्ये विविध ब्रँडचा गुटखा आढळून आला, ज्यात बाजीराव गोल्ड, पान पराग, नजर, विमल, पान बहार, राजश्री, अन्नी गोल्ड, मस्तानी तंबाखू, Jolt तंबाखू यासारख्या नामांकित ब्रँडचा समावेश होता.

आरोपी राजेश केसवाणी याने सदर प्रतिबंधित माल विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची कबुली दिली असून, अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांच्या फिर्यादीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

या कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व पथक:
या उल्लेखनीय कारवाईसाठी मा. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपआयुक्त कल्पना बारवकर, उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, स.पो.नि. योगेश ईगळे, पो.उपनि. प्रकाश झोपाटे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट क्रमांक ०१ चे जवान सहभागी होते.

अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी श्री. गजानन गोरे, मयुर मोहोड, विराज श्राप यांनीदेखील कारवाईत सक्रिय सहभाग नोंदवला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!