Join WhatsApp group

Ads

-

ऑपरेशन प्रहारमध्ये अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; प्रतिबंधित गुटखा व अवैध पेट्रोल-डिझेलसह १८,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

By Sarkar Maza

March 8, 2026 8:14 am

Ads

अकोट (प्रतिनिधी) – अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तसेच अवैधरित्या पेट्रोल-डिझेल विक्री करणाऱ्या आरोपीवर कायदेशीर कारवाई केली. या कारवाईत एकूण १८,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण (जि. अकोला) हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ग्राम अकोली जहागीर ता. अकोट येथील वासुदेव गोविंदराव मेहरे हा आपल्या गणेश किराणा दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला गुटख्याची विक्री करीत आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पोलिसांनी पंचांसह आरोपीच्या किराणा दुकानावर छापा टाकून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व इंधनाचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे :

  • विमल पानमसाला गुटखा – ४९ सिलबंद पाकिटे (किंमत ७,३५० रुपये)
  • V-1 Tobacco – ४९ सिलबंद पाकिटे (किंमत १,४७० रुपये)
  • डिझेल – ४० लिटर (किंमत ४,००० रुपये)
  • डिझेल – २० लिटर (किंमत २,००० रुपये)
  • पेट्रोल – ३५ लिटर (किंमत ३,५०० रुपये)

असा एकूण १८,३२० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७४, २७५, १२३, तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि जिवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डीसहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, पोउपनि वैभव तायडे, पोहेकॉ विठ्ठल चव्हाण, पोहेकॉ मोहम्मद नौरंगाबादी, मपोहेकॉ गीता भांगे, पोकॉ शैलेश जाधव, पोकॉ शुभम लुंगे व चालक पोकॉ अमोल मस्के यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!