Join WhatsApp group

Ads

अकोट शहर पोलिसांची गोवंश कत्तलीवर धडक कारवाई; २० क्विंटल गोमांसासह ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन बैल व एका गायीला जीवनदान

By Sarkarmzanews

February 11, 2026 7:50 pm

Ads

अकोट (दिनांक ११ ) : अकोट शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गोवंश कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २० क्विंटल गोमांसासह ४ लाख ६० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन बैल व एका गायीची सुटका करत त्यांना जीवनदान दिले आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट यांना कळविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने दोन पंचांसह कुरेशीपुरा, शौकतअली चौक, अकोट येथे छापे टाकले. छाप्यामध्ये आरोपी त्यांच्या राहत्या घराच्या समोरील खोलीत गोवंश कत्तल करताना आढळून आले. घरातून दोन बैल व एक गाय ताब्यात घेण्यात आली.

या प्रकरणी मुस्ताक अहमद अब्दुल कदीर (७१), शेख मुस्तफा शेख शेरू (६५), जुनेद अहमद जहुर अहमद (३६), जियाउल हक अब्दुल रफीक (३८), साजीद अहमद अब्दुल सादीक (३६), शेख मुरसलीन शेख मुजफ्फर (४३) तसेच फरार आरोपी इरफान अहमद अब्दुल हनीफ (५२, सर्व रा. कुरेशीपुरा, शौकतअली चौक, अकोट) यांच्याविरुद्ध कलम ५, ५(क), ९(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आरोपींकडून २० क्विंटल गोवंश मांस, दोन बैल व एक गाय असा एकूण ४,६०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अमोल माळवे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथक इंचार्ज पोउपनि निलेश बारहाते, पोउपनि शिवणकर, पोहेकॉ गणेश सोळंके, अनिल सिरसाट, नरेंद्र जाधव, सुबोध खंडारे, नापोकों विपुल सोळंके, पोकों विजय तायडे, कपील राठोड, नितेश सोळंके, अश्विन चौव्हाण व आरसीपी पथकाने पार पाडली.

या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!