Join WhatsApp group

Ads

अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप कडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता

By Sarkarmzanews

October 26, 2024 12:33 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २६ऑक्टो २४ – नुकत्याच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार अकोला पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून विजय अग्रवाल यांची उमेदवारी निश्चित होण्याची दाट शक्यता असल्याचे समजते.

त्यांचा महानगरपालिका प्रशासनामध्ये दांडगा अनुभव व धूर्त राजकारणी म्हणून अशी ओळख असलेल्या माजी महापौर विजय अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून विशेष करून या मतदारसंघात तेच निवडून येण्याची चर्चा जोर धरत आहे .

महायुतीमध्ये भाजपच्या वतीने अनेकांची नावे व दावेदारी सर्व जिल्ह्यांचे लक्ष वेधून घेत आहे अशा या अस्तित्वाच्या स्पर्धेमध्ये विजय अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.


महायुतीमध्ये अजित पवार गटाचे खंबीर नेतृत्व असलेले विजय देशमुख यांनी आपली दावेदारी दाखल केल्यानंतर हा मतदारसंघ अजित पवार यांच्या गटाला अर्थात राष्ट्रवादीला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. विजय अग्रवाल यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना नक्कीच उमेदवारी मिळणार असे वातावरण होते .

विश्वसनीय सूत्रांचा माहिती प्रमाणे अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप कडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!