Join WhatsApp group

Ads

-

अकोला जिल्ह्याला मिळणार केंद्रीय विद्यालय – युवा खासदार अनुप धोत्रे यांचा प्रयत्नाला यश

By Sarkarmzanews

December 11, 2024 10:33 am

Ads

प्रेमराज शर्मा : अकोला : दि. ११ : केंद्रीय विद्यालय ही भारतातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची एक प्रणाली आहे, जी मुख्यत्वे भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी तयार केलेली आहे. हे 1963 मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून ते भारताच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. तसेच सामन्य नागिरकांचा पाल्यांना यात प्रवेश असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अध्यक्षते खाली मंत्रीमंडळ सिमिती ने संपूर्ण देशात नागरी / सुरक्षा क्षेत्र अंतर्गत ८५ नवीन केंद्रीय विद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली असून महाराष्ट्रात ३ केंद्रीय विद्यालय सुरु होणार आहे.

या मधून एक केंद्रीय विद्यालय अकोला येथे सुरु करायला मंजुरी भेटली आहे. अशी माहिती महाराष्ट्र भाजपचे महासचिव तसेच अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सरकार माझाशी बोलताना दिली आहे.

माजी केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांचा स्वप्ण प्रत्याक्षात पूर्ण होणार असून याचा पाठपुरवठा विध्यमान युवा खासदार अनुप धोत्रे यांनी केला असून अकोला जिल्ह्याचा विकासाला अधिक गती दिली आहे.

या करिता अकोला जिल्ह्यात त्यांचा सवर्त्र कौतुक होत आहे.

 
No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!