Join WhatsApp group

Ads

-

दंगलीचा घटनास्थळी आमदार रणधीर सावरकर यांची भेट

By Sarkarmzanews

October 7, 2024 9:34 pm

Ads

न्यूज डेस्क – अकोला नवरात्राच्या पर्वावर दोन गटांमध्ये हाणामारी व दगडफेक होणे ही दुर्दैवापासून वेदनादायी असून दोन्ही समाजाने संयम ठेवून एकमेकांच्या भावनेचा आदर करण्याची गरज असून निरपराध नागरिकांवर सातत्याने असा प्रकार होणे चुकीचा असून पोलिसाने अशा तत्त्वांचा शोध घेऊन ताबडतोब कारवाई करावी

तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व शहराची परंपरा संस्कृती कायम ठेवावी व नवरात्र व दिवाळी, धम्मचक्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरी करावे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला हरिअर पेठ भागामध्ये घटना घडल्यावर ताबडतोब आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला

पोलीस प्रशासनाशी संवाद साधून राज्याचे गृहमंत्री नामदार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती देऊन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग तसेच शहर सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली

तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेतली जखमींची विचारपूस करून वारंवार घटना का घडत आहे या संदर्भात पोलिसांनी योग्य तो तपास करावा तसेच सणवार मध्ये असे प्रकार घडता कामा नये या दृष्टीने दोन्ही समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा व या अकोला शहरांमध्ये आपल्याला एकत्रित राहायचं आहे याचा विचार करून कार्य करावे महाराष्ट्राची संस्कृती अकोल्याची संस्कृती कायम ठेवावी.

निरपराध व्यक्तींवर कारवाई करता कामा नये असेही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी त्यांनी शिवसेना वसाहत हरिअर पेठ गाडगे नगर भानपुरा भांडपुरा या भागात पाहणी केली तसेच शिवनगरतील कार्यकर्त्यांची चर्चा केली सामाजिक हित लक्षात घेता छोट्या मोठ्या वादांना खतपाणी न घालता संयमाने कार्य करा अशी आव्हान त्यांनी केले

Related Article

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!