Join WhatsApp group

Ads

मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीवर कारवाई; तिघांना एक वर्षासाठी अकोला जिल्ह्यातून हद्दपार

By Sarkar Maza

March 8, 2026 8:24 am

Ads

अकोला : जिल्ह्यात वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मुंबई पोलीस अधिनियम कलम ५५ अंतर्गत एक वर्षासाठी अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये

  1. प्रतिक एकनाथ वसु (वय २३) रा. लोखंडे लेआउट, मोठी उगरी, अकोला
  2. मेहुल सुरेश जाधव (वय १९) रा. मंगरुळपीर, जि. वाशिम
  3. प्रथमेश संजय सरोदे (वय २०) रा. शिरोडा, ता. जि. अकोला

यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध मोटारसायकल चोरीसह विविध गुन्हे दाखल असल्याने दि. ४ मार्च २०२६ रोजी त्यांना अकोला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी २३ मे २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २९ सराईत गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलीस प्रशासनाच्या मते, अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए, हद्दपारी तसेच इतर प्रचलित कायद्यांनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!