Join WhatsApp group

Ads

13 वर्षांपासून एकाच खुर्चीवर ठाण! मुर्तिजापूरचे विस्तार अधिकारी व्ही. डी. किर्तने वादाच्या भोवऱ्यात. त्याचे मागील गुपित काय?

By Sarkar Maza

July 29, 2026 1:58 pm

Ads

बदली धोरणाचा बोजवारा? चौकशीची फाईल धूळ खात; तात्काळ बदली न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा

मुर्तिजापूर | प्रतिनिधी

शासनाचे बदली धोरण तीन वर्षांनी अधिकारी बदलण्याची तरतूद सांगते. मात्र मुर्तिजापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी व्ही. डी. किर्तने हे तब्बल १३ ते १४ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.जोगळे यांनी पालकमंत्री, ग्रामविकास आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून किर्तने यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली आहे.

नियम सर्वांसाठी की काहीं साठीच?

एकीकडे सामान्य अधिकारी तीन वर्षांनी बदलीला सामोरे जातात, तर दुसरीकडे एकाच अधिकाऱ्याला १३-१४ वर्षे त्याच जागी ठेवण्यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहिल्याने प्रशासनातील पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चौकशीचे आदेश… पण कारवाई शून्य?

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच बीडीओ कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीसही देण्यात आल्याचा दावा आहे. मात्र इतका कालावधी उलटूनही अंतिम निर्णय किंवा कारवाई न झाल्याने, “चौकशी फक्त कागदावरच राहिली का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासन मौन का?

या प्रकरणात प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. जर चौकशी सुरू असेल तर तिचा अहवाल सार्वजनिक का केला जात नाही? आणि आरोप निराधार असतील तर त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण का दिले जात नाही? अशा प्रश्नांची उत्तरे जनतेला अपेक्षित आहेत.

आंदोलनाचा इशारा

सुरेश जोगळे यांनी इशारा दिला आहे की, किर्तने यांची तात्काळ बदली न झाल्यास स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि हा प्रश्न राज्यस्तरावर नेला जाईल.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विस्तार अधिकारी व्ही. डी. किर्तने यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, “कोरोना महामारीमुळे 2021, 2022 आणि 2023 या कालावधीत बदली प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आली नाही.

त्यानंतर 2023-24 मध्ये निवडणुकांमुळे बदल्या रखडल्या.

प्रशासकीय बदलीच्या यादीत माझा पहिला क्रमांक आहे;

मात्र जिल्ह्यात एकही पद रिक्त नसल्याने माझी बदली होऊ शकली नाही.

यावर्षी जनगणना आणि SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेमुळेही बदली प्रक्रिया झालेली नाही.

आता पुढील काळात पुन्हा निवडणुका लागल्या, तर बदल्या आणखी एक वर्ष लांबू शकतात.

त्यामुळे बदली न होण्यामागे प्रशासकीय कारणे आहेत,” असे त्यांनी सांगितले.

यामुळे या प्रकरणात दोन भिन्न बाजू समोर आल्या आहेत. एका बाजूला स्वतंत्र भारत पक्षाने दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्या बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे किर्तने यांनी शासनाच्या बदली प्रक्रियेतील अडचणी कारणीभूत असल्याचा दावा केला आहे.

आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि पुढे काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Article

फुकटच्या शासकीय ई-क्लास जमिनीवर डोळा, कायद्याचा गैरवापर आणि गावातील राजकारण; निंबा गाव नेमके कुठे चालले आहे?

स्मार्ट मीटर की स्मार्ट मनमानी? ग्राहकांचा विश्वास जिंकणार की संताप वाढवणार?

गुरुपौर्णिमा आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर तालुक्यात पुन्हा ‘दरबारां’ची गर्दी; श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन?रेपारखेळ परिसरातील काही दरबारांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

जोशी साहेबांचा जोश हाय! ऑपरेशन प्रहारचा धडाका; अवैध हत्यारे, दारू तस्करीवर कारवाई आणि चोरीतील ₹1.10 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकाला परत

सेवानिवृत्तीआधीच बीडीओ पवार भोवऱ्यात! चौकशी अहवाल चार महिन्यांपासून ‘गुलदस्त्यात’; नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न?

“आज तो एकटा होता… उद्या तुमचीही पाळी येऊ शकते! : व्यापारी, राजकारण, समाज आणि पत्रकारितेचे आत्मपरीक्षण”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!