Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर तालुक्यातील ६० शेतकरी ‘फार्मर कप २०२६’ निवासी प्रशिक्षणासाठी रवानाआमदार हरिष पिंपळे व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांची हिरवी झेंडी

By Sarkar Maza

February 21, 2026 7:54 am

Ads

प्रतिनिधी / मूर्तिजापूर / २१ फेब्रुवारी २६ /

कृषी विभाग मूर्तिजापूर तालुका, उमेद अभियान मूर्तिजापूर, पोकरा प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फार्मर कप २०२६’ अंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील ६० शेतकरी दिनांक २० फेब्रुवारी रोजी रवाना झाले. या बसला आमदार हरिष पिंपळे व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या.

सदर प्रशिक्षण दि. २० ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कृषी विज्ञान केंद्र बडनेरा येथे आयोजित करण्यात आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातून प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी सहभागी होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, पंचायत विस्तार अधिकारी विजय किर्तने, चेतन राठोड, उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक, संघपाल वाहूरवाघ, पानी फाउंडेशन अकोला चे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार हरिष पिंपळे यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देताना आशावाद व्यक्त केला की, या प्रशिक्षणातून कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवायचे, योग्य फवारणी तंत्र, पाण्याचे नियोजन, उत्पादनाचे पॅकिंग व बाजारात अधिक दर कसा मिळवायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल. प्रशिक्षणानंतर सहभागी शेतकरी तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनाही या ज्ञानाचा लाभ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे मूर्तिजापूर तालुक्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!