Join WhatsApp group

Ads

सलग ४ वेळा आमदार हरीश पिंपळे आता होणार आमदार ते नामदार, मंत्री होण्याची शक्यता?

By Sarkarmzanews

December 5, 2024 7:11 pm

Ads

प्रेमराज शर्मा : मुर्तीजापुर दिनांक ५ : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार त्यावर आज तिढा सुटला असून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले आहे.

आता महाराष्ट्राचा जनतेला उत्सुकता आहे मंत्री मंडळ विस्ताराची आणि खाते वाटपाची, अश्या काहीश्या राजकीय चर्चा मुर्तीजापुर विधान सभा ३२ मध्ये ऐकण्यास मिळत आहे, सलग ४ वेळा निवडून आलेले आमदार हरीश पिंपळे आता आमदार ते नामदार होणार अशे फलक मुर्तीजापुर शहरात व संपूर्ण मतदार संघात पाहायला मिळत आहे, आता हे कार्यकर्त्याचे उत्साहीपणा कि खरंच मुर्तीजापुर विधानसभेला या वेळेस कुठले मंत्रीपद मिळणार आहे.

राजकीय विश्लेषकांचा प्रमाणे ४ वेळेस आमदार व अनुसुचित जातीचे असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा फायदा नक्की भेटू शकतो. त्यांना आदिवासी विकास मंत्रालय किंवा पालक मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!