Join WhatsApp group

Ads

-

दुर्गापुर पोलीस स्टेशन ठाणेदार लता वाळई च्या आशीर्वादाने परिसरा मध्ये अवैध्य धंधे जोरावर

By Sarkarmzanews

January 28, 2025 4:27 pm

Ads

दिनांक २८ : चंद्रपूर : चंद्रपूर शहरात दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही अवैध्य धंद्या वाल्यांनी आपले डोके वर उचलले असून या धंद्याणा उत आल्याचा चित्र शहरात दिसत आहे.

दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑलाईन वर्ली, टेबल जुगार, ताजी वर्ली, तांदूळ माफिया, जुगार, तीतली भवरा असे अनेक धंदे सध्या खुल्या पद्धतीने सर्रास पणे सुरु असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.

दुर्गापुर पोलीस स्टेशनची सध्या जिल्ह्यात अवैध्य धंद्याचे हॉट स्पॉट म्हणून ओळख निर्माण झाली आहे. एवढी मोठी पोलीस यंत्रणा असून पोलीस स्टेशनचा हाकेचा अंतरावर हे धंदे सर्रास पणे कसे चालत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

या अवैध्य धंद्यान मुळे अनेक गोरगरिबांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. तरुण पिढी कमी वेळेत पैसे कमविण्याचा नादात आपले तारुण्य या अवैध्य धंद्या मध्ये गमवून नैराश्याला बळी पडत आहे.

उध्वस्त होत असलेल्या कुटुंबांची व तरुण पिढीची जबाबदारी इथले ठाणेदार व पोलीस स्टेशन घेणार का? अशे प्रश्न दबक्या आवाजात इथले नागरिक करत आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी ने तरी या कडे लक्ष देवून या विषयाला गांभीर्याने घ्य्वावे अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!