Join WhatsApp group

Ads

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

By Sarkarmzanews

October 21, 2026 12:40 pm

Ads

बार्शीटाकळी, प्रतिनिधी :

सोशल मीडियावर रिल स्टार म्हणून चर्चेत असलेले मयूर काळे यांना काल मारहाण झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेला आता राजकीय वळण मिळाले आहे. मयूर काळे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या मारहाणीबाबत भाजप कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे.मयूर काळे यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी आपल्या शेतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो जाळले होते.

त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे.दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांशी संपर्क साधला असता वेगळी माहिती समोर आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर काळे आणि शिवा वानखळे यांच्यामध्ये आर्थिक कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच मारहाण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सदर घटनेमागे राजकीय कारण असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.त्यामुळे या प्रकरणात सध्या दोन वेगवेगळ्या बाजू समोर आल्या आहेत.

मयूर काळे यांचा भाजप कार्यकर्त्यांवर केलेला आरोप आणि पोलिसांकडून सांगण्यात आलेले शिवा वानखळे यांच्यासोबतचे आर्थिक कारण.

तपासानंतर नेमके कारण स्पष्ट होणार

मारहाणीमागे नेमके राजकीय कारण होते की आर्थिक वादातून घटना घडली, हे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर करण्यात आलेला दावा आणि पोलिसांकडून समोर आलेली प्राथमिक माहिती यांची तपास यंत्रणेकडून पडताळणी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, मयूर काळे यापूर्वीही सोशल मीडियावरील विविध व्हिडिओ आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे सध्याच्या घटनेबाबतही सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, पुरेशा अधिकृत पुराव्यांशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही.

मयूर काळे यांचा दावा आणि पोलिसांकडून समोर आलेली माहिती यातील नेमके सत्य तपासातून काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Related Article

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!