Join WhatsApp group

Ads

हिंदू धर्माच्या संरक्षणार्थ कार्य करत असतांना पूर्व नियोजन करून संघटित होऊन कार्य करणे गरजेचे – बजरंग दल

By Sarkarmzanews

June 5, 2025 10:51 am

Ads

०५ जून २५ : मूर्तिजापूर :- “हिंदू धर्माच्या संरक्षणार्थ कार्य करत असतांना पूर्व नियोजन करून संघटित होऊन कार्य करणे गरजेचे असून हिंदू धर्मावर विविध मार्गाने विशिष्ट धर्मा कडून वार केले जात आहे, ते रोखण्या करिता आपणास संघटित होऊन संकल्प करत संघर्ष करावा लागेल.

मातृभूमी वर जर संकट असेल तर जात, पंथ सर्व विसरून केवळ हिंदू म्हणून महाराणा प्रताप सारखे लढणे गरजे चे असून महाराणा प्रताप विरता, पराक्रमी, धर्मरक्षक असून मराठा साम्राज्य स्थापने साठी माता जिजाऊनीं ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजीनवर संस्कार केलेत म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम मुळे हिंदू धर्म कायम असून या महापुरुषांचे कार्य पुढे नेण्यासाठी आपणास शौर्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, आपल्या परिसरात लव्ह जिहाद च्या घटना घडत असेल तर त्या युवतीस ७२ तासात वापस आणण्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आपण सर्वांनी संकल्प करण्याचे वक्त्याव्य बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक निरज धानोरीया विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या विदर्भ प्रांत शौर्य प्रशिक्षणाच्या समारोपनीय कार्यक्रमात बोलत होते. मूर्तिजापूर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ प्रांत विभागाचे शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले त्याचा समारोपनीय कार्यक्रम संपन्न झाला.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ प्रांत विभागाचे शौर्य प्रशिक्षण वर्ग मूर्तिजापूर येथील स्व. परमानंद मालानी विद्यालयात २६ मे ते २ जून दरम्यान संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गाचे समारोपन सोमवार दि. २ जून रोजी बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक निरज धानोरीया यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात हिंदू धर्माचे प्रतिक भगवान प्रभू श्रीराम यांच्या पूजनाने तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आले. समारोपनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यापारी संघांचे तथा देवरन मारोती देवस्थान आरती मंडळाचे अध्यक्ष अशोक भावनानी तर प्रमुख अतिथी म्हणून बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक निरज दानोरीया, बजरंग दलाचे विदर्भ सह संयोजक सुरज भगेवार,नवीन जैन,स्व. परमानंद मालानी एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष सौरभ मालानी आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर शौर्य प्रशिक्षण वर्गासा विदर्भातील ९६ तालुक्यातून ३०० हुन अधिक प्रशिक्षणार्थी, शिक्षक तसेच व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता आशिष झाला,आनंद बांगड ,श्याम देवगिरकर,मंगेश अंबाडेकर ,नरेंद्र वाधोणकर ,गणेश प्रजापती ,सौरभ जैस्वाल,अनिरुद्ध गणोरकर ,विशाल देशमुख ,सिद्धेश जोशी,गौरव झाडोकार ,शुभम चौधरी ,रुपेश लोणारे ,मिलिंद देवगिरकर ,प्रणव बडनेरकर ,अंकित राऊत ,वैष्णव राजवैद्य आधी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!