Join WhatsApp group

Ads

वसतिगृह अधीक्षका कडून तेरा वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

By Sarkarmzanews

January 9, 2025 9:08 am

Ads

खामगाव, ८ जानेवारी: एका नराधम वसतिगृह अधीक्षकाचे कृत्य उघडकीस आले आहे. १३ वर्षीय मुलाचा अधीक्षकाने लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना चिखली तालुक्यातील पेठच्या वसतिगृहात घडली.

या घृणास्पद घटनेची तक्रार प्राप्त होताच अमडापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निखिल निर्मळ यांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन आरोपीला अटक केली.

विनायक उर्फ विनोद देशमुख (५२) असे आरोपी अधीक्षकाचे नाव असून, तो पेठ येथील रहिवासी आहे.पेठ येथे मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय अनुदान तत्वावर एकवसतिगृह कार्यान्वित आहे.

या वसतिगृहात जालना जिल्ह्यातील मजूर कुटुंबातील एक १२ वर्षे ८ महिने वयाचा मुलगा शिक्षण घेण्यासाठी राहत आहे.

नराधम अधीक्षकास विद्यार्थी भाऊ म्हणायचे. पण, त्याने माणुसकीला काळिमा फासला. दोन महिन्यांत त्याने पाच ते सहा वेळा पीडित मुलावर अत्याचार केला.

३ जानेवारीलाही त्याने हेच कृत्य केले. अखेर मुलाने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडत आईला अधीक्षकाचे दुष्कृत्य सांगितले ५ जानेवारीला दुपारी फोन करुन मुलाने ही माहिती आईला दिली.

हा प्रकार कळताच कुटुंबियांनी अमडापूर पोलिस ठाणे गाठून तक्रारनोंदविली. ठाणेदार निखिल निर्मळ यांनी ही घटना गांभीर्याने घेत अधीक्षक देशमुख विरुद्ध ६ जानेवारीला सायंकाळी ७.३० वा. विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने अशा पद्धतीचे आणखी काही विकृत गुन्हे केले काय, यादृष्टीने तपास सुरू आहे. ज्या वसतिगृह अधीक्षकाच्या भरवशावर आई, वडील आपल्या मुलांना कुठलीही शंका, कुशंका, भीती मनात न ठेवता पाठवितात, तो अधीक्षकच मुलासोबत कुकर्म करत असल्याची बाब उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!