Join WhatsApp group

Ads

-

माझोड ते तांदळी या रस्त्याची दुरवस्था

By Sarkarmzanews

December 7, 2024 6:46 pm

Ads

प्रेमराज शर्मा : पातुर, दिनांक ०७ : अकोला जिल्ह्यात पातुर तालुक्यात माझोड ते तांदळी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे या भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, प्रवाशी व वाहनचालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्‌यांची संख्या मोठी असल्याने खड्ड्‌यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागले आहेत.

वारंवार प्रशासनला सांगून सुद्धा संबधीत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे सुद्धा या कडे दुर्लक्ष आहे, वर्षानुवर्षे हा रस्ता दुरुस्तीची प्रतीक्षा करत आहे.

रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास महादेव नारायणराव भिसे उपतालुका प्रमुख शिवसेना यांनी आंदोलनचा इशारा दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!