Join WhatsApp group

Ads

ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन संपन्न.

By Sarkarmzanews

March 28, 2025 12:28 am

Ads

संस्थेचे कार्य अभिमानास्पद डॉ. स्वाती पोटे यांचे प्रतिपादन

मुर्तीजापुर : सामाजिक कार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने यशोद्यारा संस्थेद्वारा संचालित श्री गुणवंत महाराज निवासी मतिमंद व मूकबधिर विद्यालय पुंडलिक नगर मूर्तिजापूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्राथमिक गरजेच्या वस्तूचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रगतिशील शेतकरी जेष्ठ नागरिक साहेबरावजी राऊत तर प्रामुख्याने ज्ञान नर्मदा संस्थाध्यक्ष सुनीता लोडम यशोधारा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर अटल फाउंडेशनच्या डॉ. स्वाती पोटे कविता साखरे माया दवंडे, तेजस्विनी जगताप कु.शिवानी श्रीराव शेतकरी नेते अरविंद तायडे समाजसेवक रवी मार्कंड अतुल गावंडे बाळू वरघट आनंद पवार प्रसिद्ध साहित्यिक रवींद्र जवादे कल्पक कांबळे संघमित्रा कांबळे दिनेश श्रीवास सुनील भोजगडीया विलास वानखडे मिलिंद इंगळे दिवाकर सोनोने श्याम काकडे जितेंद्र चौबे वसंत अग्रवाल अमर सोनेकर दीपक खंडारे गजानन चव्हाण रणजीत शिरसाट व विद्यालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज श्री संत गुणवंत महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर पत्रकार क्षेत्रात मुर्तीजापुर चे नाव लौकिक वाढविणाऱ्या मुंबई येथील वृत्तवाहिनीच्या निवेदिका तेजस्वी जगताप यांचा सन्मान करण्यात आला व उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

संस्थेचे सचिव विष्णू लोडम यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेले उपक्रम तसेच ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून संस्थेचा प्रवास अभिनंदनिय आहे पारदर्शकता स्पष्टता महिलांचा सन्मान ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास दिव्यांग अनाथ बालकांसाठी संस्थेचे कार्य उल्लेखनीय असे आहे असे मत अटल फाउंडेशनच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.स्वाती पोटे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

व भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई शालेय साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट करण्यात आल्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवकन्या शिवानी श्रीराव आभार बाळासाहेब खांडेकर यांनी मानले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!