Join WhatsApp group

Ads

-

पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी.- अकोला येथे मोटर सायकल चोरटयास अटक – डी.बी. पथकाची दबंग कारवाई

By Sarkarmzanews

January 31, 2025 7:37 pm

Ads

अकोला : ३१ : पोलीस स्टेशन एमआयडीसी अकोला येथे फिर्यादी निलेश चक्रनारायण राहणार येवता अकोला यांनी दिनांक १३ /६/ २०२४ रोजी फिर्याद दिली की, ते काम करत असलेल्या सी.बोर्ड कंपनी एमआयडीसी क्रमांक ४ अकोला मध्ये नाईट ड्युटीला असताना रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने सी बोर्ड कंपनी चे आवारातुन त्यांची पॅशन प्रो लाल काळा रंगाची MH ३० BN ७४६१ ची किंमत अंदाजे ९०,००० /- रू ची चोरी झाली आहे.

अशा तक्रारी वरून पोस्टे ला गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता दि. ३०/०१/२०२५रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली सदर गुन्ह्यातील चोरी केलेले मोटर सायकल क्र. MH ३० BN ७४६१ ची ग्राम वानखेड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे एका इसमाकडे असून सदर गाडी तो वापर करीत आहे.

अशा माहितीवरून पोस्टेचे डी.बी.स्टाफ चे कर्मचारी ग्राम वानखेड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी सुनील अंबादास बघे वय २७ वर्ष राहणार वानखेड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गाडी चोरी करून आणल्याचे कबुली दिली वरून आरोपीचे ताब्यातुन मो सा क्र MH ३० BN ७४६१ ची कि.अं. ९०,०००/- रू ची जप्त करण्यात आली व आरोपीला सदर गुन्हयात अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब मा बच्चन सिंह , अपर पोलीस अधीक्षक मा. अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली मुळे, पो. स्टे. एमआयडीसी अकोला व डीबी पथकातील सर्व दबंग कर्मचारी पी.एस.आय. दयाराम राठोड पो.हे.काॅ. विजय अंभोरे पो.काॅ. भूषण सोळंके यांनी सदर कारवाई केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!