Join WhatsApp group

Ads

देशी पिस्तुल सह एक आरोपी अटकेत, उपविभागीय पोलिस पथकाची कारवाई.

By Sarkarmzanews

November 4, 2024 5:14 pm

Ads

प्रेमराज शर्मा – ४ नोव्हेंबर -२४ – अकोला जिल्हा पोलीस नेहमी सतर्क असून आपल्या सतर्कते चे प्रमाण आपल्या केलेल्या कारवाई मधून जनतेला देत असतात. असेच प्रमाण उपविभागीय पोलिस पथकाने दिनांक २ नोव्हेंबर २४ रोजी एक आतलं गुन्हेगारला पिस्तुल सह अटक करून सिद्ध केले आहे.

उपविभागीय पोलिस पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पियुष मोरे नावाचा एक इसम देशी बनावटीचा पिस्तुल जवळ बाळगून आकोट फाईल आपातापा रोड परिसरा मध्ये फिरत आहे. तत्काळ माहिती मिळताच उपविभागीय पोलिस पथकाने अकोट फाईल पोलीस सोबत घेऊन कारवाई केली.

पियुष राजेश मोरे वय 23 वर्ष राहणार आंबेडकर नगर अकोट फाईल अकोला याचा कडून एक देशी बनावटीचा अग्निशास्त्र देशी कट्टा पिस्तुल किंमत अंदाजे ३००००/रु. पो. स्टे. अकोट फाईल येथे कलम 3,25 आर्म अक्ट अधिनियम अनुसार आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला.


कारवाई करताना पीएसआय रत्नदीप पलासगर, हेड कॉन्स्टेबल विनय जाधव, अनिल खेडकर,संदीप गुंजाळ,शेख नदीम, पोलीस कॉन्स्टेबल राज चंदेल, अस्लम शहा यांचा उपस्थितीत कारवाई झाल्याच्या समजते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!