Join WhatsApp group

Ads

अनैतिक संबंधातून एकाचा खून – आरोपीला केली अटक

By Sarkarmzanews

January 31, 2025 8:46 am

Ads

अमरावती : दिनांक ३१ : अमरावती ग्रामीण जिल्हयातील पो.स्टे. तळेगाव हद्दीत निमगव्हाण फाटा जवळ स्कुटी क्रमांक एच एच २७सो. आर. ३७५० वर एक ईसम रक्तात पडुन असल्याची माहिती पो.स्टे. तळेगाव यांना दिनांक २९/०१/२०२५ चे २१/३० वा. पोलिसांना प्राप्त झाली होती.

तळेगाव पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होवून पहाणी केली असता अज्ञात आरोपीतांनी मृतक नामे मनोज वामणराव नागापुरे वय ४० वर्ष, रा. तळेगाव दशासर याचे डोक्यावर जड वस्तुने जबर प्रहार करुन ठार मारल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले. सदर घटनेचे अनुषंगाने मृतक यांचा भाऊ नामे सुनिल वामनराव नागपुरे, रा. तळेगांव यांचे तक्राररीवरून पो स्टे. तळेगांव येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घटनेची माहिती मा. श्री. विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांना मिळाताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन स्था.गु.शा. व पो.स्टे. तळेगाव येथील पोलीस अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन केले त्यानुसार गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून अटक करणेकामी पो.स्टे. तळेगाव व स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथके तयार करण्यात आली.

पोलीस पथकाने सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्हा गावातीलच एका व्यक्तीने केला आहे वरून संशयीत म्हणून उमेश शिवा शिंदे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने खुनाच्या गुन्हयाची कबुली दिली.

तसेच मृतक मनोज वामणराव नागापुरे वय ४० वर्ष, रा. तळेगाव दशासर याची पत्नी हीचे उमेश शिवा शिंदे याचे सोबत अनैतीक संबंध होते व मृतक हा त्यांचे अनैतीक संबंधामध्ये अडसर ठरत होता, तसेच याच कारणावरून ता आपल्या पत्नीस मारहाण करित होता म्हणून आरोपी उमेश शिवा शिदे रा. तळेगाव याने घटनेच्या दिवशी मृतक यास दारु पिण्याचे वहाण्याने त्याचे शेतात नेवून मयत बेसावध असतांना त्याचे डोक्यावर लोखंडी गजगोठयाने जबर प्रहार करून जिवानिशी ठार केले व त्यानंतर अपघाताचा बनाव करण्याकरीता मृतक व त्याची स्कुटी रस्त्याचे कडेला आणून टाकली असल्याची आरोपीने कबुली दिली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढोल तपास तळेगांव (द.) पोलीस करित आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा.. अमरावती ग्रामीण, मा. श्री. अनील पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, स पो.नि. रामेश्वर धोंडगे ठाणेदार पो.स्टे. तळेगाव दशासर, पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, पो.उप.नि. सागर हटवार, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, व स्था.गु.शा. व पो.स्टे. तळेगाव दशासर येथील अंमलदार यांनी केली

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!