Join WhatsApp group

Ads

फिरायला गेलेल्या महिलेचा खून अकोला नवीन हिंगणा संकुलात राहणारी महिला

By Sarkarmzanews

January 7, 2025 1:58 pm

Ads

दिनांक ७ : अकोला: आज मंगळवारी सकाळी आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत फिरायला गेली होती. दरम्यान, घराच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत आरोपीचा जुना वाद होता, त्याने संधी साधून महिलेवर हल्ला करून खून केला.

स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेलाही आरोपींनी जखमी केले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नवीन हिंगणा संकुलात राहणाऱ्या ४८ वर्षीय सविता ताथोड हिचा शेजारी राहणाऱ्या धीरज चुंगडे याच्याशी दोन महिन्यांपूर्वी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता.

या वादानंतर आरोपी सुडाच्या भावनेने पेटून उठला होता. घरातून निघाल्यानंतर काही अंतरावर ती मुख्य रस्त्यावर येताच आरोपी धीरज तेथे पोहोचला आणि महिलेशी वाद घालत त्याने तिचा गळा आवळून खून करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या महिलेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने महिलेला जखमी करून सविता ताथोड यांचा गळा आवळून खून केला.

घटनेनंतर आरोपी धीरज चुंगडे घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन लेव्हारकर हे सहाय्यक कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. गुन्हा करणाऱ्या धीरज या आरोपीचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!