Join WhatsApp group

Ads

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

By Sarkarmzanews

December 12, 2024 6:54 am

Ads

न्यूज डेस्क :मुंबई, दि. १२: दिनांक १० डिसेंबर २४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ., सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार), सहयोगी प्राध्यापक, प्रसुती शास्त्र व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynecology),

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी), सहायक प्राध्यापक, आय.सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र (I.C.C.U. General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब (सातारा) या परिक्षांचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्गचा निकाल जाहीर प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्ग या पदाच्या मुलाखती २८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या.

या पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ चार निकाल जाहीरसहयोगी प्राध्यापक, शारीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ चे निकाल जाहीरप्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या प्रतिक्षायादीच्या निकाल जाहीरमहाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल १० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

परीक्षेच्या अंतिम निकालानुसार प्रतिक्षायादीतून उमेदवार उपलब्ध करुन देण्याची शासनाने मागणी केली आहे. त्यानुसार अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने पदासाठीची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रतिक्षायादीतून गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या शिफारशी शासनाकडे करण्यात येत आहेत.

प्रतिक्षा यादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

Related Article

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!